जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती कमी करा : ममता बॅनर्जी यांचे मोदींना पत्र
कोलकाता - जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात, तसेच साठेबाजांवर कारवाई करावी आणि पुरवठा वाढवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करा अशा मागण्या ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे केल्या आहेत. तसेच कांदा आणि बटाट्यासारख्या आवश्यक खाद्यपदार्थांच्या किंमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण असावे आणि तसे अधिकार राज्याला द्यावेत अशीही मागणी देखील ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
"केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं पाहीजे. यासाठी तत्काळ पावलं उचलत राज्यांना शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे. कृषी उत्पादने, पुरवठा, वितरण आणि विक्रीवर नियंत्रण येणं आवश्यक आहे. असे नियंत्रण आणता यावे यासाठी राज्यांनी कायदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी" अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी पत्रामध्ये केली आहे. ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना चार पानी पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज