अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर होणाऱ्या तात्काळ सुनावणीने वाद : दुष्यंत दवे यांची नाराजी
नवी दिल्ली : रिबप्लिक न्यूजचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. मात्र, अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर होणाऱ्या तात्काळ सुनावणीने वाद निर्माण झालाय. वरिष्ठ वकील आणि सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करणारं पत्र सुप्रीम कोर्टाच्या सेक्रेटरी जनरल यांना लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात अर्णब गोस्वामी यांची याचिका दाखल झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यावर सुनावणी कशी? असा सवाल उपस्थित केला आहे.
दवे यांनी आपल्या पत्रात, अशा प्रकारच्या इतर याचिका सुनावणीसाठी येण्यास वेळ लागतो. पण, गोस्वामी यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी होते आहे. याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.मुंबई उच्च न्यायलयाने अंतरिम जामीन नाकारल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती.दरम्यान, अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींच्या जामीन अर्जाच्या याचिकेवर अलिबाग सत्र न्यायालयात गुरूवारी सुनावणी होणार आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज