शिक्षकांच्या लोकल प्रवासावरून  आता राज्य सरकार आणि रेल्वेमध्ये पुन्हा एकदा वाद


 


शिक्षकांच्या लोकल प्रवासावरून  आता राज्य सरकार आणि रेल्वेमध्ये पुन्हा एकदा वाद




मुंबई :  शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षकांच्या लोकल प्रवासावरून  आता राज्य सरकार आणि रेल्वेमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची विनंती केली. मात्र राज्य सरकारचे पत्र उशिरा मिळाल्याचा दावा रेल्वेने केला आहे.




केंद्राची परवानगी आणि तयारी करण्यासाठी वेळ लागेल असे सांगत लोकल सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला पत्राद्वारे कळवले होते. त्यामुळे नवरात्री निमित्तानं राज्य सरकारने महिलांना दिलेल्या या विशेष भेटीवर विरजण पडले होते. त्यानंतर महिलांसाठी लोकल प्रवास खुला करण्यात आला. आता शाळा सुरु होणार असल्याने शिक्षकांना रेल्वेतून प्रवास करता यावा म्हणून राज्य सरकारने रेल्वेला पत्र पाठविले. मात्र, पुन्हा एकदा कारण देत राज्य सरकारकडेच बोट दाखवले आहे. 



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured