Type Here to Get Search Results !

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल


 


सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल




मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  कोरोनावर मात करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परत कामाला लागले होते. यानंतर आता पुन्हा एकदा मुंडे  उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. 




यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. परळी, बीड व मुंबई असा सातत्याने प्रवास, अनेक लोकांशी थेट संपर्क यादरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामकाजाचा अहवाल त्यांनी कोरोना वॉर्डमधून सादर केला होता. 
धनंजय मुंडे यांनी आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच तब्येतीची माहिती दिली आहे. "तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल" असं मुंडे यांनी म्हटलं आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies