“अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला” : एकनाथ खडसे


 


“अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला” : एकनाथ खडसे


 जळगाव - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होऊन भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, हा नाथाभाऊ दिलदार आहे. नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं मला सांगितलं गेलं. त्यावर मी म्हटलं की, मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकण्यात आले.
त्याच व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला, असे खडसे म्हणाले.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेस केल्यापासून एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमकपणे टीका करत आहेत. मी संपूर्ण जीवन पक्षासाठी खर्च केलं. एकनिष्ठ राहीलो. मात्र मला एका माणसानं छळलं, असा आरोपही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post