अर्णब गोस्वामी यांची सुटका करा : राम कदम 

अर्णब गोस्वामी यांची सुटका करा : राम कदम 


 


अर्णब गोस्वामी यांची सुटका करा : राम कदम 


 मुंबई –अर्णब गोस्वामी यांना अटक केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. यासाठी मागील आठवड्यात राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, त्याचसोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली होती.
आज आमदार राम कदम हुतात्मा चौक ते मंत्रालयापर्यंत पायी जाणार असून त्याठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट घेणार आहेत. अर्णब गोस्वामी यांची सुटका करा आणि अटक केलेल्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी राम कदम गृहमंत्र्यांना करणार आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आलेले आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments