योगी आदित्यनाथ म्हणतात अर्णब गोस्वामी देशातील मोठे पत्रकार

योगी आदित्यनाथ म्हणतात अर्णब गोस्वामी देशातील मोठे पत्रकार


 


योगी आदित्यनाथ म्हणतात अर्णब गोस्वामी देशातील मोठे पत्रकार
नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अर्णब गोस्वामी हे देशातील एक मोठे पत्रकार असल्याचे म्हटले आहे. पण यापूर्वी एका टीव्ही शोमध्ये अर्णब गोस्वामी  म्हणत आहेत, योगी आदित्यनाथ तर असे व्यक्ती आहेत, त्यांना धर्माच्या बाबतीत काही माहीतच नाही. ते असे अशिक्षित व्यक्ती आहेत, की कुणी त्यांना सांगायला हवे, तुम्ही तुमचे मानसिक संतुलन तपासून घ्या.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ता पवन पांडे यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत, ‘क्या से क्या हो गया देखते-देखते,’ असे कॅप्शन दिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाषणाचा काही भाग या व्हिडिओमध्ये आहे. ते काँग्रेसवर यात लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत आहेत. योगी आदित्यनाथांनी यात म्हटले आहे, काँग्रेसने 1975 मध्ये आणीबाणी लादली होती आणि आजच आपण पाहिले असेल, की आपल्या स्वार्थासाठी देशातील एका फार मोठ्या पत्रकाराला अटक करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करण्याचे काम काँग्रेसने केले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


Post a comment

0 Comments