"महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे कुणाचाही आवाज दाबला जात नाही” : संजय राऊत

"महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे कुणाचाही आवाज दाबला जात नाही” : संजय राऊत


 


"महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे कुणाचाही आवाज दाबला जात नाही” : संजय राऊत


 मुंबई : "एका पत्रकाराला अटक होते, आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला पाहिजे," असे पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की प्रसारमाध्यमांबाबत सुप्रीम कोर्टानं आपलं निरीक्षण नोंदविले आहे.  "प्रसारमाध्यमे म्हणजे तुम्ही न्यायालय नाही, तुम्ही कोणाच्याही विरोधात काहीही व्यक्तव्य करू शकत नाही," असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदविलं असल्याचे राऊत यांनी सांगितले. 


 "महाराष्ट्र सरकार सुडभावनेनं काम करीत नाही, पोलिसांकडे पुरावे असतील तर कुणावरही कारवाई करू शकतात, " असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. यानंतर पत्रकारांशी राऊत बोलत होते. "महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे कुणाचाही आवाज दाबला जात नाही, पोलिसाकडे सबळ पुरावे असल्याशिवाय ते कुणालाही अटक करीत नाहीत," असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. 


 खासदार संजय राऊत म्हणाले, "अभिनेता सुशांतसिह प्रकरणात राज्य सरकारवर अर्णब गोस्वामी यांनी आरोप केले आहेत, याबाबतही चैाकशी व्हायला पाहिजे. या राज्यात कोणी चुकीचं काम करीत असेल, त्याच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत असते, मग ते पत्रकार, अभिनेता, वकील कुणीही का असो. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. जे चुकीचं काम करतील त्यांच्यावर कारवाई होणारच" 
 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments