Type Here to Get Search Results !

“फक्त कोरोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत”. : जनता दल युनायटेड पक्षाने मान्य केला पराभव


 


फक्त कोरोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत” : जनता दल युनायटेड पक्षाने मान्य केला पराभव



बिहार : मतमोजणी सुरु झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजपा प्रणीत एनडीए आणि महाविकास आघाडीमधील अंतर बरचं कमी झालं आहे. एनडीए आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत सुरु आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे.




“लोकांनी जो कौल दिलाय, त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रीय जनता दल किंवा तेजस्वी यादव यांनी आमचा पराभव केलेला नाही पण करोना व्हायरसमुळे आम्ही पराभूत झालो आहोत” असे जनता दल युनायटेडचे प्रवक्ते के.सी.त्यागी एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले. “फक्त करोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत. मागच्या ७० वर्षात बिहारची जी अधोगती झाली, त्याची किंमत आम्ही चुकवतोय” असे जनता दल युनायटेचे नेते के.सी.त्यागी म्हणाले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies