पत्रके, पोस्टर्स छापण्यासंबंधी नियमांचे प्रकाशक, मुद्रक, मालक यांनी काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


 


 


सांगली : भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक-2020 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दि. 2 नोव्हेंबर 2020 पासून निवडणूक आचारसंहिता लागू केलेली आहे. या अनुषंगाने पत्रके किंवा पोस्टर्स छापण्यासंबंधी नियमांचे प्रकाशक, मुद्रक, मालक यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 


 


  लोकप्रतिनिधीत्व कायदा-1951 चे कलम 127-A च्या तरतुदी विशेषता मुद्रक आणि प्रकाशक यांचे नांव व पत्ता निवडणूकीच्या पत्रकावर किंवा पोस्टर्सवर किंवा इतर कोणत्याही छापील बाबीवर छापणे आवश्यक आहे. त्यांनी छापलेल्या साहित्याच्या चार प्रति आणि प्रकाशकाचे लोकप्रतिनिधीत्व कायदा-1951 कलम 127A प्रमाणे घ्यावे लागणारे प्रतिज्ञापत्र जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे छपाईच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत सादर करावयाचे आहे. मुद्रकाने कोणतेही निवडणूक पत्रक किंवा पोस्टर्स छापण्यापूर्वी प्रकाशकाकडील लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 कलम 127-A (2) प्रमाणे परिशिष्ट - अ मध्ये प्रतिज्ञापत्र करुन देणे आवश्यक आहे. असे प्रतिज्ञापत्राच्या मुद्राकांची असणाऱ्या दोन व्यक्तिनी साक्षांकित केले पाहिजे.  


  वरील प्रमाणे मुद्रकांनी छापलेल्या पोर्स्टरच्या चार प्रति सोबत त्याने विशिष्ट पत्रकाच्या किती प्रति छापल्या आणि छपाईची किती किंमत आकारली याचीही माहिती परिशिष्ट - ब मध्ये जिल्हादंडाधिकारी यांना कळविली पाहिजे. ही माहिती एकत्रित न देता प्रत्येक पत्रकाची किवा पोस्टर्सची त्या-त्या वेळी तीन दिवसाचे आत दिली पाहिजे. 


 


 लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 कलम 127-A चे खाली तरतूदीचे उल्लंघन केल्यास कलम 127-A (4) खाली 6 महिन्याचा कारावास अथवा रुपये 2 हजार रूपये दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात, असे  जिल्हाधिकारी डॉ .अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured