Type Here to Get Search Results !

उदयनराजे यांची चांदीची बंदूक चोरणाऱ्या युवकास अटक


 


उदयनराजे यांची चांदीची बंदूक चोरणाऱ्या युवकास अटक



सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानातून शोभेची चांदीची दोन किलोची बंदूक चोरून नेणाऱ्या युवकास शाहुपुरी पोलिसांनी अटक केली असून दीपक पोपट सुतार (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोमवारी दुपारी राजवाडा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दीपक सुतारकडे चांदीची बंदुक असल्याचे निदर्शनास आले. 



 


त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे ही बंदूक कुठून आणली, अशी चौकशी केल्यानंतर त्याने सुरुवातीला माझ्या एका मित्राने दिली असल्याचे सांगितले, मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ही दोन किलोची चांदीची शोभेची बंदूक खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानातून चोरली असल्याची कबुली दिली. तसेच इतर चांदीच्या वस्तूही त्याने चोरल्या असण्याची शक्यता धरून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies