सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान’मधील अभिनेत्याचा कोरोनाने  मृत्यू

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान’मधील अभिनेत्याचा कोरोनाने  मृत्यू


 


 सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान’मधील अभिनेत्याचा कोरोनाने  मृत्यू
शिमला : कोरोनाने अनेक नेते, अभिनेते आपल्या विळख्यात घेतले असून सिनेसृष्टीवर याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. यावर्षात बॉलिवूडला अनेक धक्के सहन करावे लागले. प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्री आणि कलाकारांच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा असताना सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान’मधील अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. हरीश बंचता असे या अभिनेत्याचे नाव आहे. हरीश हिमाचलमध्ये आपल्या कुटुंबासोबत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. यातच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.  


शिमलामध्ये राहणार हरिश गेल्या 18 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची एक ओळख निर्माण केली होती. 48 वर्षीय दिवंगत हरिश यांनी बॉलिवूडमधील बर्या च चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र बजरंगी भाईजानमधील त्यांच्या भुमिकेचे सर्वांनीच कौतुक केले. या चित्रपटात हरिश यांनी पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments