त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही : चंद्रकांत पाटील यांचा इशारा  

त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही : चंद्रकांत पाटील यांचा इशारा  


 


त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही : चंद्रकांत पाटील यांचा इशारा  


 अमरावती : मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी मागील काही दिवसांपासून भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. आज अमरावती जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात तिवसा येथे आंदोलन करण्यात आले. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी 2012 मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर आता  यशोमती ठाकूर यांना अमरावतीच्या न्यायालयाने तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा यासाठी भाजप कडून आंदोलन केले जात आहे. त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अमरावती मधील तिवसा येथे दिला.त्यांना  न्यायालयाने  शिक्षा सुनावली असताना त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नसून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले .जोपर्यंत मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments