“तर मी दिलगिरी व्यक्त करतो.'' : एकनाथ खडसे


 


“तर मी दिलगिरी व्यक्त करतो.'' : एकनाथ खडसेमुंबई - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसेंनी मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले असं विधान केले होते, त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी असं म्हटलं आहे. 


 
ब्राह्मण महासंघाच्या इशाऱ्यानंतर आता, एकनाथ खडसेंनी ट्विट करुन माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलंय. तसेच दिलगिरी व्यक्त केली आहे. ''दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.'', असे खडसेंनी म्हटलंय.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

Previous Post Next Post