उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का : आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं कोरोनामुळे निधन

उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का : आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं कोरोनामुळे निधन


 


उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का : आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : भाजप आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं वयाच्या 50 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. सुरेंद्र सिंह हे अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट या मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. तर काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीने त्यांची साथ सोडली होती. महिन्याभरापूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं.
आमदार सुरेंद्र सिंह यांच्या अचानक जाण्यामुळे उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा झटका बसला असून त्यांची पोकळी कधीही भरून न निघाणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे. सुरेंद्र सिंह जीना हे उत्तराखंड भाजपाचा एक अनुभवी युवा चेहरा मानला जात होते. आतापर्यंत ते 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र प्रकृती खालवल्यानं त्यांचं गुरुवारी निधन झालं.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments