शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" : अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर टीका 

शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" : अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर टीका 


 


शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" : अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर टीका 
मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 
"महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादीने युती केल्याचा परिणाम बिहार निवडणुकीवर झाला आहे. काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर गेल्यानं काँग्रेसने बिहारमध्ये व्होट बँक कमी केली. तर राष्ट्रवादीच्या आधी काही ठिकाणी जागा तरी येत होत्या आता तर ते ही झालं नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. अमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" असा केला आहे. "'शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय? महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद" असं ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी बिहारमधील मतदारांचे आभार मानले आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments