Type Here to Get Search Results !

१४ नोव्हेंबर ला वीज कंपन्यातील ८६ हजार वीज कामगारांचा संप


 


१४ नोव्हेंबर ला वीज कंपन्यातील ८६ हजार वीज कामगारांचा संप 




मुंबई : प्रधान ऊर्जा सचिव असिम गुप्ता व महाराष्ट्र राज्य विघुत मडंळातील विभाजित महानिर्मिती/महापारेषण व महावितरण तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत कामगार सघंटनाची बोनसबाबतची चर्चा फिसकटल्याने १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वीज कंपन्यातील ८६ हजार वीज कामगार संपावर जाणार आहेत. तिन्ही वीज कंपनीतील कार्यरत कामगार, अभिंयते, अधिकारी सघंटना बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.




महाराष्ट्र राज्य विघुत मडंळातील विभाजित महानिर्मिती/महापारेषण व महावितरण कंपन्यात कार्यरत ८६ हजार कामगार, अभिंयते व अधिकारी याचे नेतृत्व करणाऱ्या सघंटनाची १२ नोव्हेंबर असिम गुप्ता व तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत चर्चा झाली. मात्र चर्चेत तोडगा निघालेला नाही. महामारी, निसर्ग वादळ व महापुरात जोखीम पत्करुन कामगार,अभिंयते व अधिकारी यांनी काम केलेले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी बोनस दयावे, अशी मागणी होत आहे. मात्र सरकार व तिन्ही कंपन्याचे व्यवस्थापन बोनस देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे संप करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन राज्यभर निदर्शने करण्यात येत आहे. 



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies