Type Here to Get Search Results !

 एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहून एस.टी कर्मचाऱ्याची आत्महत्या


 


 एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहून एस.टी कर्मचाऱ्याची आत्महत्या



जळगाव : दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. कोरोना महामारीमुळे ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे एसटी कर्चचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्व एसटी कर्मचारी चिंतेत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज चौधरीच्या आत्महत्येमुळे जळगाव शहरात आणि एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


 




मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.
 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies