अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही : नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारला इशारा 

अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही : नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारला इशारा 


 


अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही : नवनीत राणा यांचा ठाकरे सरकारला इशारा 


 


अमरावती :  राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. मात्र ही मदत शेतकऱ्यांसाठी तोकडी असून काही शेतकऱ्यांच्या शेतात अद्याप पंचनामे झाले नसल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची घोषणा देखील केली होती.  राणा म्हणाल्या की,'अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक – सोयाबीनचे पूर्ण हातातून गेले. यानंतर कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या आला आहे. कपाशीचे पीकसुद्धा वाया गेले आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी ५० हजार रुपये जमा करावी. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments