...आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे : संजय राऊत

...आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे : संजय राऊत

 ...आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे : संजय राऊतमुंबई :  दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.  केंद्र सरकारने रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य गांभीर्यानं घ्यावे. 'सरकारने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, कारण जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. शेतकरी आंदोलनाचा चीन, पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या रावसाहेब दानवे यांना संजय राऊत यांनी असा खोचक टोला लगावला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments