आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०५ रोजी कोरोनाचे ०९ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण सुरु होते. गेली २४ दिवस तालुक्यात सिंगल आकडी रुग्ण संख्या येत होती. परंतु दिनांक ०२ व ०३ रोजी मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन आकडी आल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज दिनांक ०९ रोजी ०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
- गावनिहाय रुग्ण संख्या
- दिघंची ०४
- आटपाडी ०४
- मुढेवाडी ०१
- एकूण ०९
आज आढळून आलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०६ व स्त्री रुग्ण ह्या ०३ असे एकूण ०९ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज