आटपाडी तालुक्यात १० ग्रामपंचायतीसाठी तब्बल ३२७ उमेदवारी अर्ज दाखल

आटपाडी तालुक्यात १० ग्रामपंचायतीसाठी तब्बल ३२७ उमेदवारी अर्ज दाखलआटपाडी तालुक्यात १० ग्रामपंचायतीसाठी तब्बल ३२७ उमेदवारी अर्ज दाखल 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२०२१ च्या अनुषंगाने आटपाडी तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणूक साठी तब्बल ३२७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची आले असल्याची माहिती आटपाडीचे तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.


यामध्ये सर्वाधिक अर्ज हे शेटफळे ग्रामपंचायती साठी ६० तर सवार्त कमी अर्ज हे पात्रेवाडी ग्रामपंचायतीसाठी म्हणजेच १५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.


गावनिहाय उमेदवार अर्ज उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी करण्यात आली होती. उमेदवार त्याच बरोबर गाव पातळीवर पार्टी प्रमुख यांची मोठ्या प्रमाणात कागदपत्रासाठी धावपळ होताना दिसत होती. त्यातच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने आजच्या दिवशी ऑफलाईन अर्ज भरण्याला उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज    


Post a comment

0 Comments