अभिनेत्री कंगनावर कोसळला दु:खाचा डोंगर

अभिनेत्री कंगनावर कोसळला दु:खाचा डोंगर
  अभिनेत्री कंगनावर कोसळला दु:खाचा डोंगर मुंबई : कायम चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतवर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वृद्धापकाळाने कंगनाच्या आजोबांचे निधन झालं आहे. ते ९० वर्षांचे होते. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून ही दु:खद बातमी आपल्या चाहत्यांनी दिली. चाहत्यांनी देखील सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आजोबांचा एक जुना फोटो शेअर करत आपण आजोबांना प्रेमानं ‘डॅडी’ म्हणूनही हाक मारायचो, अशी एक आठवण तिने सांगितली. “आज संध्याकाळी मी आईवडिलांच्या घरी गेले. मागील दोन महिन्यांपासून माझ्या आजोबांची प्रकृती ठीक नव्हती. मी घरी पोहोचले, पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतलेला होता.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपलं दु:ख व्यक्त केलं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments