ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार ; कोरोनाचा दुसरा स्ट्रेनही आला समोर : जगभरात खळबळ

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार ; कोरोनाचा दुसरा स्ट्रेनही आला समोर : जगभरात खळबळ

 ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार ; कोरोनाचा दुसरा स्ट्रेनही आला समोर : जगभरात खळबळइंग्लंड : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सापडल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच कोरोनाचा दुसरा स्ट्रेनही समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेहून परत आलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःला आयसोलेट करावे, असं आवाहन ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून सापडलेला अवतार यूकेत सापडलेल्या अवतारापेक्षा अधिक खतरनाक असल्याचं मानलं जातं. कारण त्याच्या संसर्गाचा वेग अधिक जास्त आहे. कोरोनाचा पहिला नवा अवतार दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये सापडला होता. मात्र आता तो संपूर्ण देशात पसरला आहे. अशातच आणखी एक नवा स्ट्रेन सापडल्यामुळे घबराट पसरली आहे.
ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार सापडलेले नवीन स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या ज्या दोन केसेस आहेत, त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून प्रवास केला आहे. दक्षिण आफ्रिकेची सतर्कता आणि पारदर्शकतेबाबत आम्ही आभारी आहोत. त्यामुळेच नवीन स्ट्रेनबाबत माहिती मिळाली, असंही त्यांनी सांगितलं.
कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या दोन बाधित व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कुठल्याही व्यक्तीशी संपर्कात आलेल्या सर्व ब्रिटनच्या रहिवाशांनाही क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या नव्या अवताराबाबत संशोधन केलं जात आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments