शेतकरी आंदोलनाबाबत क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या ट्विटमधून इशाऱ्याचा संदेश
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला अनेकांचा पाठिंबा आहे. आता क्रिकेटपटू हरभजन सिंग यानेही शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. हरभजनने शेतकरी आंदोलनाबाबत तीन दिवसात चार ट्विट आणि एवढीच रिट्विट केली आहेत. पण काल त्याने केलेलं ट्विट इशाऱ्याचा संदेश होता.
Be careful who you trust, even salt looks like sugar
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 10, 2020
सरकार आणि शेतकरी आंदोलकांच्या या वादात हरभजन सिंग आंदोलकांच्या बाजूने आहे. कोणत्याही व्यक्तीवर विचार करून विश्वास ठेवा, कारण मीठही साखरेसारखं दिसतं, असं हरभजन म्हणाला. या ट्विटमध्ये हरभजनने शेतकरी आंदोलन किंवा सरकारचं नाव घेतलं नाही.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज