यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपीस अटक ; अटक झालेल्या आरोपींची संख्या पाचवर

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपीस अटक ; अटक झालेल्या आरोपींची संख्या पाचवर
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपीस अटक ; अटक झालेल्या आरोपींची संख्या पाचवरअहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. रेखा जरे यांच्यावर 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता. काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 5 पथके तयार केली होती.रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोल्हापूरमधून फरार आरोपीला अटक केली आहे. रेखा जरे यांची हत्या करण्यामागे कारण काय आहे, याचा तपास पोलीस करीत करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काल तीन आरोपींना अटक केली. राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातून रात्री दोघांना आणि कोल्हापूर येथून एकाला अटक करण्यात आली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments