अभिनेत्री कंगनाचा दिलजीतसह प्रियांका चोप्रालाही ट्विट करत टोला

अभिनेत्री कंगनाचा दिलजीतसह प्रियांका चोप्रालाही ट्विट करत टोला

 अभिनेत्री कंगनाचा दिलजीतसह प्रियांका चोप्रालाही ट्विट करत टोला मुंबई : काही दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असून सरकारने अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. मात्र यावरून काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यामध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु होते. आता पुन्हा एकदा ट्विट करत कंगनाने दिलजीतला सुनावले असून अभिनेत्री प्रियांका चोप्रालाही टोला लगावला आहे.कंगनाने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट रिट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यामातून तिने प्रियांका आणि दिलजीतला कृषी विधेयक समजावण्याचा प्रयत्न केला आहे. ”प्रिय दिलजीत दोसांज, प्रियांका चोप्रा जर तुम्हाला खरच शेतकऱ्यांची चिंता आहे आणि तुम्ही खरच आपल्या मातांचा आदरसन्मान करत असाल तर कृषी कायदा काय आहे ऐकून घ्या! की तुम्ही फक्त आपल्या मातांचा, बहिणींचा आणि शेकऱ्यांचा वापर करुन देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचा विचार करत आहात का? वाह रे दुनिया वाह…” अशा आशयचे ट्विट कंगनाने प्रश्नि विचारला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments