‘अग्गंबाई सासूबाई’ फेम, ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनावर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केला शोक व्यक्त

‘अग्गंबाई सासूबाई’ फेम, ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनावर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केला शोक व्यक्त
 ‘अग्गंबाई सासूबाई’  फेम, ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनावर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केला शोक व्यक्त ठाणे : रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन. ते ८३ वर्षांचे होते. पटवर्धन यांच्या निधनावर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी शोक व्यक्त केला. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत रवी पटवर्धन यांनी निवेदिता यांच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. “रवी काका आपल्यात नाहीत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही”, असं म्हणताना त्या भावूक झाल्या.त्यांच्या निधनाच्या वृत्तावर माझा विश्वासच बसत नाही. ते ऑनस्क्रीन माझ्या सासऱ्यांची भूमिका साकारत होते. या वयातही ते सर्व गोष्टींचा ताळमेळ अत्यंत सुरेख पद्धतीने राखतात, असं आम्ही सतत बोलायचो. त्यांनी कधीच कोणाची मदत घेतली नव्हती. आयुष्यात कधीही हार मानू नये, ही मोलाची शिकवण त्यांनी मला दिली. वयाच्या ८३व्या वर्षी ते काम करत होते.”रवी पटवर्धन यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. “त्यांच्या पायाला दुखापत झाली होती आणि तरीही ते सेटवर आले होते. ते कसं काम करू शकतील अशी चिंता आम्हाला सतावत होती. पण त्यांनी कोणाला काहीच त्रास न देता किंवा मदत न घेता सर्व काही काम पूर्ण केलं. त्यांनी मला खूप काही शिकवलं. दोन दिवसांपूर्वीच आम्ही ते सेटवर पुन्हा कामाला येतील असं बोलत होतो. पण आता ते कधीच येऊ शकत नाहीत”, असं म्हणताना निवेदिता सराफ भावूक झाल्या.रवी पटवर्धन यांनी वयाच्या ८४व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेली पन्नास वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून मनोरंजन करण्याचं काम केलं. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
शनिवारी रात्री त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री १०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मार्चमध्ये ही हृदयविकाराचा झटका आला होता. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. कला क्षेत्रासाठी स्वा. सावरकर प्रतिष्ठनाचा ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सावरकर स्मृती पुरस्कार देण्यात आला होता. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील, अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळाल्या असल्या, तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments