अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक

अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक
 अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटकचेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री २९ वर्षीय चित्राचा १० डिसेंबरला हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. चित्राच्या आईने तिच्या पतीने आपल्या मुलीची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहलावातून मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं निष्पन्न झालं असून आर्थिक समस्यांमुळे आत्महत्या केल्याची शक्यता तपासात समोर येत आहे. चित्राचा पती हेमनाथ याच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.काही महिन्यांपूर्वीच चित्राचं लग्न झालं होतं. काही मालिकांमध्ये चित्राने बोल्ड सीन दिल्याने हेमनाथ नाराज होता असं तपासात समोर आलं आहे. “हेमनाथला तिने टीव्ही मालिकेत दिलेला सीन आवडला नव्हता. ज्या दिवशी चित्राचा मृत्यू झाला, त्यादिवशी त्याने दिला धक्काही दिला होता,” अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हेमनाथची चौकशी सुरु होता. चित्राचे मित्र आणि सेटवरील सहकाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. ‘पांडियन स्टोर्स’ या मालिकेतील चित्राची भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेत तिने मुलई ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे चित्रा प्रकाशझोतात आली होती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments