Type Here to Get Search Results !

ममता बॅनर्जी नंतर नितीश कुमार यांच्या जदयूला भाजपमुळे मोठे खिंडार




 ममता बॅनर्जी नंतर नितीश कुमार यांच्या जदयूला भाजपमुळे मोठे खिंडार



पटना : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीश कुमार यांच्या सहा आमदारांना फोडलं आहे. अरुणाचलमध्ये जदयूचे सात आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदारांनी आता भाजपामध्ये  प्रवेश केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी नंतर नितीश कुमार यांच्या जदयूला आता मोठे खिंडार पडले आहे.



याशिवाय, पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे लिकाबाली मतदारसंघातील आमदार करदो निग्योर यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. पंचायत व महापालिका निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर ही माहिती समोर आली आहे.



तर, रमगोंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार तालीम तबोह, चायांग्ताजोचे हेयेंग मंग्फी, ताली येथील जिकके ताको, कलाक्तंगचे दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिला येथील डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकु मतदारसंघातील कांगगोंग टाकू यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जदयूने २६ नोव्हेंबर रोजी सियनग्जू, खर्मा आणि टाकू यांना पक्ष विरोधी कार्यावाही केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती व त्यांना निलंबीत देखील केले होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies