ॲमेझॉन आणि मनसेचा वाद आता न्यायालयात ; मनसेला सत्र न्यायालयाची नोटीस

ॲमेझॉन आणि मनसेचा वाद आता न्यायालयात ; मनसेला सत्र न्यायालयाची नोटीस
 ॲमेझॉन आणि मनसेचा वाद आता न्यायालयात ; मनसेला सत्र न्यायालयाची नोटीस मुंबई : ॲमेझॉनच्या ऍपमध्ये मराठी भाषा असावी अशी मनसेचे मागणी आहे. मात्र मनसे ही मागणी पूर्ण करण्यास ऍमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. परिणामी ॲमेझॉन आणि मनसेचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे.'नो मराठी नो ॲमेझॉन मनसे'ची मोहीम अधिक आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनद्वारे विविध ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर फाडले. हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे सचिव यांना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस सत्र न्यायालयाकडून पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं  ठरणार आहे. मनसे पदाधिकारी अखिल चित्रे हे न्यायालयात ॲमेझॉन विरोधात लढत आहेत. याविषयी पुढील तारीख ५ जानेवारी २०२१ देण्यात आली आहे. Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments