Type Here to Get Search Results !

“ॲमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की” : मनसे

 



“ॲमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की” : मनसे 


मुंबई : न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा ॲमेझॉनला दिला आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली. यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये ॲमेझॉनसोबतचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.



यावेळी ते म्हणाले की, “मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ॲमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. ॲमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे”. पुढे ते म्हणाले की, “खटले दाखल करण्याचा प्रयोग त्यांनी सुरु केला आहे. १९ तारखेला माझ्याविरोधात केस टाकली होती. आता राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचं दुसाहस त्यांनी केलं आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. अशा फालतू नोटीसला आम्ही फार किंमत देत नाही. मराठीसाठी कोणत्याही केसेस अंगावर घेण्याची तयार आहोत हे ॲमेझॉनने लक्षात ठेवावं”.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies