चोरीचा आरोप करणाऱ्या महिलेची अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीरपणे माफी

चोरीचा आरोप करणाऱ्या महिलेची अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीरपणे माफी

 चोरीचा आरोप करणाऱ्या महिलेची अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीरपणे माफीमुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर चहावर आधारित एक कविता शेअर केली होती.मात्र, ‘ही कविता आपण लिहिली असून बिग बींनी ही कविता शेअर करत साधं क्रेडिटदेखील दिलं नाही’, असं टीशा अग्रवाल यांनी म्हटलं होतं. टीशा यांनी बिग बींच्या कमेंट सेक्शनमध्ये याविषयी मत व्यक्त केलं होतं. सोबतच स्वत:च्या फेसबुक पोस्टमध्येही याविषयी लिहिलं होतं. त्यानंतर बिग बींनी एक नवीन ट्विट करुन टीशा यांची माफी मागितली आहे. “या ट्विटचं श्रेय टीशा अग्रवाल यांना दिलं पाहिजे. ही मूळ कविता कोणाची आहे हे मला माहित नव्हतं. मला कोणी तरी ही पाठवली होती. मला ही कविता छान वाटली त्यामुळे मी ती पोस्ट केली होती”, असं म्हणत बिग बींनी जाहीरपणे टीशाची माफी मागितली आहे. बिग बी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ते त्यांच्या वडिलांचे विचार किंवा एखादी आवडलेली कविता, विचार ट्विटरवर शेअर करत असतात.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments