चिंता वाढली ; लंडनहून दिल्लीला आलेल्या विमानातील पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

चिंता वाढली ; लंडनहून दिल्लीला आलेल्या विमानातील पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

 
चिंता वाढली ; लंडनहून दिल्लीला आलेल्या विमानातील पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्हनवी दिल्ली : भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटनबरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ब्रिटनमधून एकही विमान भारतात येणार नाही आणि भारतातून एकही विमान ब्रिटनसाठी उड्डाण करणार नाही. पूर्वानुभव लक्षात घेता, खबरदारी म्हणून भारत सरकारने ही पावले उचलली आहेत.दरम्यान काल रात्री दिल्ली विमानतळावर एका विमानातील पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे प्रवासी विमान लंडनहून आले होते. एकूण पाच जणांना कोरोनाची बाधा झाली. या पाच प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी NCDC ला पाठवण्यात आले आहेत. या प्रवाशांना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.यूकेहून येणाऱ्या विमानांना निर्बंध लागू होण्याआधी दोन नियोजित विमानांपैकी एक विमानात हे कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी आढळले. जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये नवीन स्ट्रेन आहे का? ते अजून स्पष्ट झालेले नाही. तपासणी आणि संशोधनानंतरच ते स्पष्ट होईल. लंडनमध्ये या नव्या स्ट्रेनचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारकडून सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments