चिंता वाढली ; गोव्यात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

चिंता वाढली ; गोव्यात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

 चिंता वाढली ; गोव्यात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्हपणजी : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुपाची दहशत जगभरात पसरली आहे. त्यातून ब्रिटेन आणि इंग्लंडहून भारतात परतलेले लोक आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्यानं भारतात देखील नव्या कोरोनाच्या रुपाचा शिरकाव होतोय की काय अशी शंका उपस्थित होत आहे. नागपुरात इंग्लडहून परत आलेल्या एका तरुणाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता गोव्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.गोव्यात 9 ते 20 डिसेंबरदरम्यान ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 9 ते 20 डिसेंबरदरम्यान ब्रिटनवरून 979 प्रवासी भारतात आले होते. नव्या गाईडलाईन प्रमाणे या नागरिकांच्या rt-pcr चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सर्व 11 रुग्णांना आरोग्य प्रशासनाने निगराणी खाली ठेवला असून नव्या कोरोनाचा स्टेन या प्रवाशांमध्ये आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी त्यांचे नमुने पुण्याच्या नॅशनल व्हायरालॉजी लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. याबाबत प्रशासन सतर्क झाले. त्यादृष्टीनं नियोजन आणि उपाययोजना करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे गोव्यासह महाराष्ट्रातील आरोग्य प्रशासनानं अलर्ट जारी केला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments