आठवलेंचा ‘गो कोरोना गो’ नंतर ‘नो..कोरोना…नो..’ असा नारा

आठवलेंचा ‘गो कोरोना गो’ नंतर ‘नो..कोरोना…नो..’ असा नारा
 आठवलेंचा ‘गो कोरोना गो’ नंतर ‘नो..कोरोना…नो..’ असा नारा मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याच्या आधी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी  फेब्रुवारी महिन्यात मुंबईत चीनी राजदूत आणि काही बौद्ध धर्मगुरूंसोबतच्या कार्यक्रमात ‘गो कोरोना गो’ असा नारा दिला होता. आठवलेंच्या ‘गो कोरोना गो’ ची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. रामदास आठवले यांना देखील कोरोना झाला होता. त्यातून ते बरे झाले. डॉक्टरांनी दिलेला सल्ला पाळा आणि आपली काळजी घ्या असं आवाहन त्यांनी त्यावेळी केलं होतं.रविवारी कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनबद्दल आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘मी आधी गो कोरोना गो…असा नारा दिला होता. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना पहायला मिळत आहे. आता कोरोनाच्या नवीन स्ट्रेनसाठी मी ‘नो..कोरोना…नो..’ असा नारा दिला आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments