भाजपचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

भाजपचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
 भाजपचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता


पंढरपूर : भाजपचे नेते कल्याणराव काळे कल्याणराव काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा आहे. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटले. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण  यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments