“भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्र्यांना म्हणाले, पवारांची ताकद असती तर”...

“भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्र्यांना म्हणाले, पवारांची ताकद असती तर”...
 “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपमुख्यमंत्र्यांना म्हणाले, पवारांची ताकद असती तर”...  शिर्डी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपावर निशाणा साधला होता.तसेच भाजपातून महाविकास आघाडी येणाऱ्यांना पुन्हा निवडून आणू, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं असून, अजित पवारांना चिमटा काढला आहे.अजित पवारांना सोबत घेऊन दुसऱ्यांदा सत्तेत आलेलं फडणवीस सरकार काही तासांतच कोसळलं होतं. ही बाब भाजपा नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्यांचं वारंवार दिसून आलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानातून ही अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे.अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी घडलेल्या राजकीय नाट्याची आठवण देत टोला लगावला. “अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते, तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं ठरलं नसतं,” असं म्हणत चंद्रकातं पाटील यांनी अजित पवारांना चिमटा काढला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

 Post a comment

0 Comments