Type Here to Get Search Results !

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार !
 ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार ! 


मुंबई : ओबीसी सेलने समाजातील ३६४६ जातींना एकत्र आणणारा मेळावा आयोजित केला पाहिजे असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केले आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार ! अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारला इशारा दिलाय. भाजप ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते. एकाच पक्षाची लोकं वेगवेगळी भूमिका घेतात, काँग्रेस - राष्ट्रवादी तुमची नेमकी भूमिका काय आहे ते सांगा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. ओबीसी विकास महामंडळला आधी एकही पैसा दिला जात नव्हता. आपल्या सरकारच्या काळात ५०० कोटींचा निधी दिला वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. मात्र या सरकारच्या काळात एकही पैसा महामंडळला दिलेला नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपल्या सरकारच्या काळांत महाज्योतिची निर्मिती केली आणि त्यासाठी निधी दिला मात्र आज महाज्योती कुठे आहे असा प्रश्न पडल्याचे ते म्हणाले.
या सरकारमधील मंत्र्यांनीच ओबीसी समाजाच्या आरक्षणपुढे प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मला आश्चर्य वाटतं, सरकारमधील मंत्रीच मोर्चे काढतात, खरं तर राजीनामा दिला पाहिजे त्यांनी. सरकारमध्ये आहांत ना मग मंत्रिमंडळमध्ये विषय मांडा. तिथे बोलणार नाही, तिथे गप्प, मात्र बाहेर बोलणार अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले. विकासाची कोणतीही भूमिका मांडायची नाही. मात्र ओबीसीचे प्रश्न सोडवायचे नाही. एमपीएससी परिक्षांचे काय होणार ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies