पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड

 पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगिरथ भालके यांची बिनविरोध निवडपंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद रिक्त झालं होतं. आता चेअरमनपदी भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.दरम्यान, भगिरथ भालके यांच्या बिनविरोध निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा शब्द महत्त्वाचा ठरला. विठ्ठल परिवार एकत्र ठेवण्याची गरज शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं बहुमतानं भगिरथ भालके यांची निवड केली आहे. साहाय्यक निंबळक एम. एस. तांदळे यांच्या अध्यक्षेतेखाली चेअरमनपदी भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड झाली. सगळ्यांनी साथ दिल्यानं भगिरथ भालके यांच्या रुपात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सर्वात तरुण चेअरमन मिळाला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments