“यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे” : भाजपा नेत्याची शिवसेनेवर टीका
 “यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे” : भाजपा नेत्याची शिवसेनेवर टीकामुंबई : “सध्या कोकणात उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार सकारात्मक भूमिका घेईल,” असं विधान शिवसेनेचे लांजा-राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी  यांनी केलं होतं. राज्यात नाणार आणि जैतापूर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पहायला मिळाली. मात्र नंतर यावर थेट मातोश्रीवरुन खुलासा करण्याची वेळ आली. दरम्यान विरोधकांनी यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे.शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापुर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे.भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे. “प्रकल्पाला अगोदर विरोध करायचा आणि सेटलमेंट झाल्यानंतर स्थानिकांचा विरोध मावळला सांगून प्रकल्पाचे समर्थन करायचं. हेच धंदे करत करत इथपर्यंत आले,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. “प्रकल्पाला विरोध करून सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad