एलआयसी पॉलिसी संदर्भात मोठी बातमी ; एलआयसीकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा

एलआयसी पॉलिसी संदर्भात मोठी बातमी ; एलआयसीकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा
 एलआयसी पॉलिसी संदर्भात मोठी बातमी ; एलआयसीकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा मुंबई :  कोरोनाच्या काळात लोक अनेक अफवांना बळी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर एलआयसीने नागरिकांना व ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तुमची एलआयसी पॉलिसी असेल किंवा एलआयसी पॉलिसी काढण्याच्या विचारात तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सध्या एलआयसी पॉलिसीधारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतेय.फसवणूक करणारे एलआयसी अधिकारी, आयआरडीएआय अधिकारी बनून ग्राहकांना कॉल करतायत. पॉलिसीची रक्कम तत्काळ मिळण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करतायत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये  म्हणून एलआयसीने ट्वीट करून ग्राहकांना सावध केलंय.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments