“तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही” ; केजरीवाल यांचा योगी आदित्यनाथ यांना टोला

“तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही” ; केजरीवाल यांचा योगी आदित्यनाथ यांना टोला
 “तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही” ; केजरीवाल यांचा योगी आदित्यनाथ यांना टोला नवी दिल्ली  : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच राज्यांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे वाढवण्यात आले आहेत. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना चाचण्यांवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीशी तुलना करत सरकारची कामगिरी मांडली आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 24 कोटी आहे आणि 10 महिन्यांत 8 हजार नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली. दिल्लीची लोकसंख्या पावणेदोन कोटी असून करोनाने 10 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यूपीच्या कोविड व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. यूपीतील कोविड व्यवस्थापन ज्यांना दिसत नाही, त्यांनी सार्वजनिक स्थळावरून माहिती घ्यावी. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वसामान्यांच्या पाठिंब्याने हे सर्व शक्य झाल्याचं योगी आदित्यनाथ म्हटलं आहे."योगी आदित्यनाथ यांना जागे असताना, झोपताना, उठताना, बसताना फक्त दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीचं दिसते" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच "कोरोनासंदर्भातील आमच्या शानदार कामाची चर्चा ही उत्तर प्रदेशमध्ये होते. आम्ही तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही" असं देखील केजरीवालांनी म्हटलं आहे. याआधी योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाने होणारे मृत्यू कमी आहेत. कोरोना संसर्गाची साखळी प्रत्येत पातळीवर तोडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असं म्हटलं होतं. त्यावर आता केजरीवालांनी निशाणा साधला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments