Type Here to Get Search Results !

‘परंतु सरकार चर्चेपासून पळ काढतंय, असं आमच मत आहे’ : या भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर आरोप

 



‘परंतु सरकार चर्चेपासून पळ काढतंय, असं आमच मत आहे’ : या भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर आरोप


मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या, मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसींमधील भीतीचं वातावरण, महिला अत्याचारांच्या वाढणाऱ्या घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आम्ही मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने ती अमान्य करत केवळ दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सरकार चर्चेपासून पळ काढतयं, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.



फडणवीस म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी प्रचंड संकटात आहे. काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला चपराक दिली आहे, असं असताना फक्त विधान मंडळात याबाबत चर्चा होऊ शकते. परंतु सरकार चर्चेपासून पळ काढतंय असं आमच मत आहे. सरकार अनलॉक करतंय. बहुतेक सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत, मग विधानमंडळाचं अधिवेशन का होऊ शकत नाही. जर दोन दिवसांसाठी सगळे सदस्य योग्य ती काळजी घेऊन येणार असतील तर दोन आठवड्यांचं अधिवेशन घ्यायला हवं, अशी आमची मागणी होती. ती आमची मागणी झालेली नाही.”


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies