Type Here to Get Search Results !

संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन यांसारख्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयात दाखल करण्यास सवलत : धनंजय मुंडे




  संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन यांसारख्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयात दाखल करण्यास सवलत : धनंजय मुंडे



मुंबई : कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेत मार्च 2021 पर्यंत उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात दाखल करण्यास सूट देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या निर्णयाबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन यांसारख्या अनेक योजना विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येतात. या प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात सादर करण्याचा नियम आहे.



या योजनांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, रोगग्रस्त, वयोवृद्ध व्यक्तींना कोविड-19 चा धोका अधिक आहे, याचा विचार करून मुंडे यांच्या निर्देशानुसार विशेष सहाय्य विभागाने विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सन 2019-20 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला मार्च – 2021 पर्यंत तहसील कार्यालयात सादर करण्यास सूट देणारे परिपत्रक जारी केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies