“फक्त लग्नासाठी धर्मांतर करणे अयोग्य” : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

“फक्त लग्नासाठी धर्मांतर करणे अयोग्य” : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
 “फक्त लग्नासाठी धर्मांतर करणे अयोग्य”  : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय नवी दिल्ली : देशभरात सध्या लव्ह जिहादचा वाद सुरु असतानातच सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय दिला आहे.  लग्नासाठी धर्मांतर करण्याच्या मुद्यावर अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. ‘फक्त लग्नासाठी धर्मांतर करणे योग्य नाही’, या हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावेळी मुख्य सरन्यायाधिशांच्या खंडपीठानं या निर्णयावर हस्तक्षेप करण्यास नकार दिला.‘न्यायालय एखाद्या व्यक्तीला त्याच्या मर्जीनुसार धर्म निवडण्याचा हक्क देणार नसेल तर राज्यघटनेनं त्याला दिलेल्या मुलभूत अधिकाराचं उल्लंघन होईल’, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments