आता पुण्यातही विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची सक्ती

आता पुण्यातही विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची सक्ती

 आता पुण्यातही विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची सक्तीपुणे : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची सक्ती करण्यात आली आहे.पुणे शहरात काल रात्रीपासून संचारबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसंच मालेगाव शहरातही संचारबंदी लागू झालेली आहे. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्यूबाबत आदेश काढला आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातही संचारबंदी निर्णय लागू झाला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 22 डिसेंबरपासून  करण्यात येत आहे. राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments