कोरोनाचे संकट कायम ; राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊन वाढवला

कोरोनाचे संकट कायम ; राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊन वाढवला

 कोरोनाचे संकट कायम ; राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊन वाढवलामुंबई : जगातील १६ देशांत नव्या कोरोनाचा प्रसार झाला आहे. भारतातही नव्या कोरोनाचे २० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच कोविडचा धोका कायम असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन ३१ जानेवारी २०२१पर्यंत लागू राहील, असे स्पष्ट करुन राज्य शासनाचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, यूकेवरून महाराष्ट्रात आलेल्या ४३ प्रवाशांचे नमुने तपासले आहेत, त्यात नवा स्ट्रेन आढळला नाही. तसेच यूकेवरून आलेले प्रत्येक व्यक्तीची योग्य तपासणी केली जात आहे. प्रवासी निगेटिव्ह असला तरी आम्ही त्याला होम क्वारंटाईन करतो. राज्य सरकार यूके स्ट्रेनबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करत आहे, पण काही प्रवासी गायब असतील तर राज्य सरकार योग्य ती पावले उचलेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ते म्हणाले पूर्वीच्या मार्गदर्शक सूचना पाळावयाच्या आहेत. कोविडसाठी जे निर्बंध घालण्यात आले आहेत, ते लागू आहेत. रेल्वे सेवेबाबत ते म्हणाले, नव वर्षात  कोविड रुग्ण संख्या किती वाढतेय त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबईतील लोकल सेवा सुरू करायच्या की नाही, शाळा, कॉलेज सुरू करायच्या की नाही हे सगळे निर्णय संख्येवर अवलंबून आहेत.  यूकेतील नवीन स्ट्रेनवर आपण लक्ष ठेवून आहोत.  याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments