नृत्य इतिहासकार सुनील कोठारी यांचे निधन
नवी दिल्ली : नृत्य इतिहासकार व समीक्षक सुनील कोठारी यांचे रविवारी सकाळी दिल्ली येथील रुग्णालयात निधन झाले, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते ८७ वर्षांचे होते. महिनाभरापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
त्यांना पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले होते. त्यांचा जन्म २० डिसेंबर १९३३ रोजी मुंबईत झाला. त्यांनी वीस पुस्तके लिहिली असून त्यात भारतीय नृत्य प्रकारांवर नवा प्रकाश टाकला आहे. त्यात सत्रिया डान्सेस ऑफ आसाम, न्यू डायरेकशन्स इन इंडियन डान्स ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. भरतनाटय़म, ओडिशी, छाहू, कथ्थक, कुचीपुडी या नृत्य प्रकारांवर त्यांनी लेखन केले. रबींद्र भारती विद्यापीठाच्या उदय शंकर अध्यासनाचे ते प्रमुख होते. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या नृत्य विभागात अध्यापन केले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज