Type Here to Get Search Results !

जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टर मध्ये महाराष्ट्रातील जवानास वीरमरण




 जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टर मध्ये महाराष्ट्रातील जवानास वीरमरण



नाशिक  :  मनमाडच्या अस्तगाव येथील जवान सुरेश घुगे यांना वीरमरण आले आहे. कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून यांना वीरमरण आले रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून त्यांच्या निधनाने मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली. 



गुरुवारी रात्री डोंगरावर गस्त घालत असतांना पाय घसरून घुगे खाली पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले. सुरेश घुगे 2006 साली सैन्य दलात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियन मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 9 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. जवान घुगे यांच्या निधनानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावानं भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies